दादरच्या शाखाप्रमुखाचे माणुसकीचे दर्शन, कोविड रुग्णाचे वाचवले प्राण

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

 शिवाजी पार्क येेथिल एम.बी. राऊत रोड वरील देसाई कॉटेज इमारतीतील जुन्नरकर या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला,कुटूंबाला कोविडने ग्रासले होतेे.कुटूंबात चार व्यक्ती भाऊ युरोप मध्ये, आई कोविडने नायर हॉस्पिटलमध्ये प्रकृती चिंताजनक, वडिलांचे कोविडने पहाटे घरीच मृत्यु झाला. त्यांची मुलगी सुप्रिया जुन्नरकर (वय- ४२ )घरीच पॉझिटीव्ह, 3 दिवस तापाने हैराण झाली होती. वडिलांना कोण सांभाळणार, या विवंचनेत,तिचीही परिस्थिती दुपारी चिंताजनक झाली, कोणीही शेजारी मदतीला आले नाही,पैसा असून काही उपयोग नाही,कोणीही माणुसकीही दाखविली नाही, . मात्र शिवसेेेना शाखाप्रमुख यशवंत विचले यांना माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी भेट देऊन फोनाफोनी करून त्यांची रवानगी रुग्णालयात करून त्यांचे प्राण वाचवले.

   सविस्तर माहिती अशी शिवसेना नेते दिवाकरजी रावते व श्रीमती.विशाखा राऊत यांना त्यांच्या हितचिंतकाने फोन केला असता,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याांनी शाखाप्रमुख  यशवंत विचले यांना संपर्क करून घटनास्थळी जाण्यास सांगितले.व माहिती घेण्यास सांगितले,ती महिला एकटीच घरी तिला बोलवत नव्हते. चालता येत नव्हतं, अंगात ताप, ऑक्सिजन लेवल 85 ते 90 तब्येत चिंताजनक होती कोणीही धीर द्याला नव्हते नातेवाईक ही नाही,मोठया फ्लॅट मद्ये एकटी असल्याने आई हॉस्पिटलमध्ये, वडील सकाळी वारले होते, या घटनेची धक्कादायक माहिती रावते साहेब व विशाखाताई राऊत यांना  देताच लागलीच महानगर पालिकेची यंत्रणा कामाला लागली अतिरिक्त आयुक्त मनपा पासून हेल्थ डिपार्टमेंट मधील सर्व कामाला लागले, त्या महिलेला लागलीच तयारी करायला सांगितले, रुग्णवाहिका दहा मिनिटात आली, पंधरा मिनिटात नायर हॉस्पिटल दहा मिनिटात बेड,एक्सरे व रिपोर्ट करुन सक्षम उपचाराला सुरवात झाली,कोणीही नातेवाईक नसल्याने पुर्ण जवाबदारी मला घ्यावी लागली,तिची तब्येत ठीक आहे, तिला बेड तिच्या आईच्या बाजूला करून देण्यात आला,मायलेकीची तब्येत ठीक आहे या मोहिमेत श्री.दिवाकर रावते साहेब, श्रीमती. विशाखाताई राऊत यांचे मार्गदर्शन व श्री. विजय नंदिवडेकर (शिवसैनिक), श्री.अक्षय शिंगरे (गटप्रमुख), यांची साथ मिळाली.मोहीम फत्ते झाली त्या महिलेचे प्राण वाचले. ही माहिती सर्वांना मिळताच शाखाप्रमुख यशवंत विचले आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.