कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश

 

सातारा दि. 20 (जिमाका): कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.

ना. शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सूचना केल्या.

पोलीसही कोरोना बाधित होत आहेत, या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज