पाटण ताुक्यातील या गावात एकाच कुटुंबातील 11 जण कोरोना बाधित.

 तूपेवाडी लॉकडाऊन.एकाच कुटुंबातील ११ जण कोरोना पाॅझिटिव्ह.
तुपेवाडी(काढणे) येथील एकाच कुटुंबातील ११ जण कोरोना पाॅझिटिव्ह. तूपेवाडी लॉकडाऊन. हा परिसर मिनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर.  

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 

     तुपेवाडी (काढणे) ता.पाटण येथील एकाच कुटुंबातील तब्बल ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व मंगेश खबाले यांनी ही माहिती दिली आहे. एकाच वेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्यामुळे आरोग्य यंत्रणा  हादरून गेली असून या गावात तळ ठोकत सर्व गावाचे सर्वेक्षण हाती घेतले आहे.  

याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील आठ दिवसापूर्वी तुपेवाडी मधील ७० वर्षीय पुरुष व्यक्तीला त्रास होत असल्याने ते कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यानां कोविड ची टेस्ट करा असे सांगण्यात आले. त्यांनीं टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क सहवासात असलेल्या 12 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला. यामध्ये 11 जणांना करोनाचा प्रादूर्भाव झाला असल्याची बाब उघड झाली. हे सर्वजण एकाच गावातील आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने परिसराचे निर्जंतुकी करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

हा सर्व परिसर मिनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष पवार ,तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व मंगेश खबाले,आरोग्य सहाय्यक पावरा, आरोग्य सेवक रोहित भोकरे ,ग्रामसेवक बी.एस.पवार,पोलीस पाटील सौ.भोसले मॅडम, धर्यशील सपकाळ ,व्ही.जी.फाळके , स्वप्नील कांबळे, आशा सेविका योगिता तुपे, सरपंच सूरज चक्के, अजित पाटील, निलेश पाटील ,प्रविण पाटील उपस्थित होते. बाधित असलेल्या सर्व जण होमआयसोलोशन मध्ये आहेत. त्याच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर करण्यात येत आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.उमेश गोंजारी यांनी केले आहे.