जिंती प्राथमिक उपकेंद्रात लसीकरण .

 


तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा

 सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जिंती उपकेंद्र ता पाटण या ठिकाणी कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन शासनाच्या नियमानुसार करण्यात आले होते. या उपकेंद्रांत वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना कोविड ची लस देण्यात आली. 

यावेळी उपकेंद्राला पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ मिनाताई साळुंखे यांनी सदिच्छा भेट दिली व लसीकरणाची पाहणी केली. ही लसीकरण मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर बी पाटील , सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. 

यावेळी जिंती गावचे सरपंच दामाजी कदम ,उपसरपंच , उमेश चव्हाण, उपकेंद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ बंडु गोडेकर , 

डॉ .कोमल लोकरे ,रावसाहेब ,सिद्धार्थ गवई, मेघा म्हात्रे , करवटे इत्यादी आरोग्य सेवक वर्ग लसीकरण मोहिमेत सहभागी होता. या लसीकरणात जवळपास २२५ लोकांनी कोविड ची लस घेतली आहे.