गावठी पिस्तूल विरुद्ध लोखंडी पाईप; दोन युवकांचा भर रस्त्यात फिल्मी स्टाइल थरार.

मारामारीत एक गंभीर जखमी ; दोन्ही युवकांना ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळीच केली अटक.

ढेबेवाडी | नितीन बेलागडे

     गुढे (ता. पाटण) येथे सोमवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास गाडी आडवी मारण्याच्या कारणावरुन दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही घटना कराड- ढेबेवाडी मार्गावर गुढे गावाजवळ भर रस्त्यात सुरु असतानाच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार पोलीसांसह घटनास्थळी अचानक दाखल होतात एका युवकाच्या हातामध्ये पिस्तुल असताना देखील जिवाची पर्वा न करता झडप घालून गावठी पिस्तूल काढुन घेऊन त्या दोघा युवकांना ताब्यात घेतात.

जुल्म ओ बिमारी है जिसका इलाज मैं हु...



       एखाद्या चित्रपटातील प्रसंगा प्रमाणे हा प्रसंग होता मात्र या सगळ्या प्रसंगातील रियल हिरो होते स.पो.नी संतोष पवार.

"जुल्म ओ बिमारी है जिसका इलाज मैं हु..." 
 हे संतोष पवार यांनी पुन्हा आपल्या कारवाई तुन सिध्द करून दाखविले आहे.प्रसिद्ध अभिनेता सनि देवल यांच्या फर्ज चित्रपटातील थरार आणी डायलाॅगची या घटनेमुळे आठवण होते. 

                ढेबेवाडी- कराड मार्गावरील गुढे बस थांब्याजवळ चित्तथरारक घटना घडली. एकमेकांना गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून सचिन जनार्दन सुतार वय 36 आणि रोहित सुनील माने वय 24 या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असतानाच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांचे सहकारी तळमावलेकडून ढेबेवाडीकडे वाहनातून निघाले होते. मारामारी करणाऱ्या एकाच्या हातात लोखंडी पाईप तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल सापडले. घटनेचे गांभीर्य ओळखून स.पो.नी संतोष पवार आणि समवेत असणाऱ्या पोलीसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मात्र तत्पूर्वीच यातील एकाच्या डोक्यात घाव घातल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.तो जखमी युवक खाली पडला त्यावेळी त्याच्या जवळ गावठी पिस्तुल असलेचे सपोनि संतोष पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी झडप घालून त्याला पकडले व पिस्तुल तसेच जमीनीला दाबुन धरून ठेवून पोलीस हवालदार नवनाथ कुंभार यांस ते काढून घेण्यास सांगितले यामुळे मोठा अनर्थ टळला . दरम्यान जखमी युवकाला तात्काळ ताब्यात घेवून ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्याची प्रकृती स्थिर असून सध्या दोघेही पोलीसांच्या ताब्यात आहेत . 

                ढेबेवाडी पोलीसांकडून पिस्तूलधारी युवकाची कसुन चौकशी सुरू आहे. ते पिस्तूल कोणाचेे ? कुठून आणले आहे ? मारामारीचे नेमके कारण काय ? याची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.घटनास्थळी कार्यवाहीत सपोनि संतोष पवार यांचेसह, सहाय्यक पोलिस फौजदार आर.एल.अंकुशे,पोलिस हवालदार संदेश लादे,राजू घाडगे,शशिकांत खराडे,बाजीराव शेवाळे,नवनाथ कुंभार सहभागी होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीसांमुळे अनर्थ टळला...

वर्दळीच्या रस्त्यावर गुढे बसथांब्याजवळ दोन युवकांत तुंबळ हाणामारी सुरू असतानाच पोलीस हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला.अगदीच चित्रपटातील प्रसंगाप्रमाणेच हा प्रसंग होता.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. युवकाच्या हातात पिस्तूल असतानासुद्धा पुढे जाण्याचे धाडस ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी केल्याने मोठा अनर्थ टळला.त्यांच्या धाडसाचे उपस्थितांतून मोठे कौतुक होत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖