श्री संतकृपा डी फार्मसी मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी  डी. फार्म  येथे राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.   

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी  डी. फार्म  या महाविध्यालयाने कोरोनाची वास्तविक परस्थिती जाणून ``ऑनलाईन पोस्टर प्रेझेंटेशन” हि राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. 

 यावेळी स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध महाविद्यालयाचे विध्यार्थी सहभागी झाले होते.  

 विद्यार्थ्यांना फार्मसी बद्दल जास्तीत जास्त अध्ययावत ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना निर्माण व्हाव्यात व त्याचा फायदा समाजाला व्हावा व आर्थिकदृष्ट्या त्या ज्ञानाची मदत व्हावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास कसा वाढावा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत व्हाव्यात म्हणून स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अतिशय महत्वपूर्ण विषय या महाविध्यालयाने निवडले होते. जसे कि 1] Safe of Effective Medicines to All. 2] Online Pharmacy. 3] Immunization : Covid 19. 4] Importance of Health During Covid Pandemic. 5] Medication Use & Role of Pharmacist. 

  यावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक यांनी सर्व स्पर्धकांना महाविद्यालया बाबत माहिती करून दिली. व स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. 

  या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ममता बिसुरकर व पूनम माळी [ आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, विटा ] यांनी पटकावला.तर

  द्वितीय क्रमांक शुभम कोराडे [ सौ. वेणूताई चव्हाण फार्मसी कॉलेज, फलटण ] या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने मिळविला. तर तृतीय क्रमांक मनिष बनकर [ भारती विद्यापीठ ] व मानसी निकम [ गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ फार्मसी, लिंब ] यांना विभागून देण्यात आला. 

  या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राहुल अडनाईक व अतुल कदम यांनी काम पाहीले. प्रास्ताविक सोनल सातपुते यांनी केले व आभार दिप्ती पाटील यांनी मानले. 

  या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या वैशाली महाडिक यांनी केले.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज