घोगांव ग्रामपंचायती कडुन अपंग व्यक्तींना अनुदान वाटप

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा
         मौजे ग्रामपंचायत घोगांव च्या सरपंच सौ सीमा धनाजी पाटील यांनी अपंग व्यक्तींना अनुदान वाटप केले आहे प्रत्येक अपंग व्यक्तीच्या खात्यावर 1000 रु अनुदान .जमा केले.सद्या अपंगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मदतीने त्यांना नक्कीच लाभ होईल. अपंग व्यक्तींना अनुदान वाटप केल्याने सरपंच सौ सीमा पाटील यांचे अपंगांनी आभार मानले.

या प्रसंगी सरपंच सौ सीमा पाटील यांनी मत व्यक्त करताना म्हणाल्या की सर्व शासकीय योजना प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोचविण्यासाठी मी प्रयत्न करणार असून शासनाच्या सर्व योजना गावामध्ये राबविणार आहे. तसेच अपंग व्यक्तींना पुढील वर्षी यापेक्षा जास्त अनुदान देण्याचा प्रयत्न करणार आहे.

सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत येउन माहीती घ्यावी अशी सुचना यवेळी केली.मा. उपसरपंच निवास शेवाळे यांनी यानिमित्ताने ग्रामपंचायत सर्वांसाठी सर्व सूविधा पूरवण्यासाठी नेहमी तयार आहे याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं मत व्यक्त करून आभार मानले.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज