स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी बी. आर. पाटील यांची नियुक्ती

 


पदभार स्वीकारताना बी. आर. पाटील समवेत अँड. आनंदराव पाटील, माजी प्राचार्य बी.पी. मिरजकर, जगन्नाथ माळी, राजाराम सुतार आदी.

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:                       
उंडाळे येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी बी. आर. पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज आपल्या कामाचा पदभार स्वीकारला.      

ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या हौसाई कन्याशाळा मलकापूरचे मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांची आज येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त करण्यात आली. यावेळी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक ॲड. आनंदराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.                                    

यावेळी माजी प्राचार्य बी. पी. मिरजकर यांची या वेळी उपस्थिती होती. 

यावेळी अँड. आनंदराव पाटील म्हणाले ग्रामीण भागातील पाचवड फाट्यापासून येळगांव पर्यंत सर्वात मोठे  विद्यालय असून या विद्यालयात चरण, येळापूर,येवती, आदी ठिकाणावरून लांबून विद्यार्थी येत असतात. विद्यालयांमध्ये सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. विविध स्पर्धांपरिक्षेची तयारी करून घेतली जाते. विद्यालया ने आजपर्यंत विविध क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केले आहे. या पुढील काळात विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.      

सत्काराला उत्तर देताना प्राचार्य बी. आर. पाटील म्हणाले विद्यालयांमध्ये सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्याबरोबर विद्यालयात अकरावी आणि बारावी, पाचवी ते दहावी विद्यार्थी संख्या भरपूर आहे. या पुढील काळात ही विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन त्त्यानी दिले.                                     

या वेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार शंकर आंबवडे यांनी मानले.