2001 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

 


 सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4239), कराड 244 (14460), खंडाळा 162 (5629), खटाव 114 (7577), कोरेगांव 117 (7741),माण 177 (5147), महाबळेश्वर 92 (3073), पाटण 110 (3689), फलटण 253 (11520), सातारा 372 (21159), वाई 249 (7014 ) व इतर 439 असे आज अखेर एकूण 91687 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची आजची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (92), कराड 3 (404), खंडाळा 0 (78) ,खटाव 6 (223), कोरेगांव 3 (219), माण 1 (124), महाबळेश्वर 1 (28), पाटण 1 (110), फलटण 3 (163), सातारा 12 (686) व वाई 3 (164) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.