मलकापूर येथील कोव्हिड-19 लसीकरण केंद्राचा आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे शुभारंभ.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सध्या संपुर्ण भारतामध्ये कोव्हिड-19 च्या अनुषंगाने 45 वर्षावरील सर्व नागरीकांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु असून देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण सुरु आहे. याअनुषंगाने मलकापूर नगरपरिषद आरोग्य विभाग व जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्र, काले अंतर्गत मलकापूर आरोग्य उपकेंद्र यांचे संयुक्त विद्यामाने "जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून "कोव्हिड-19 नागरी लसीकरण केंद्र शुभारंभ" मा. आमदार पृथ्वीराज चव्हाणसो, (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते ऑनलाईन करणेत आला. त्यावेळी तहसिलदार अमरदिप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, नगराध्यक्षा सौ.निलम येडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. यादव, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका व अधिकारी वर्ग उपस्थित होता. सदर लसीकरणासाठी तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती कराड व जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्र, काले अंतर्गत मलकापूर आरोग्य उपकेंद्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

सदर शुभारंभावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे मलकापूर शहरातील नागरीकांना सदर लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर लसीचे 2 डोस असून पहिला घेतल्यानंतर दुसरा डोस 1‍ महिन्यांनी अथवा 6 आठवड्यानंतर डॉक्टर सांगतिल त्याप्रमाणे घ्यावी. सदर लसीकरण करताना आपले आधारकार्ड नोंदले की लसीकरण पुर्ण झालेनंतर त्याचे प्रमाणपत्र आपणास मिळेल व ते स्वत:कडे ठेवणे गरजेचे आहे. मलकापूर शहराच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चे पुर्व भागात भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय, नगरपरिषद कार्यालयाशेजारी, मलकापूर व पश्चिम भागात गणेश कॉलनी आगाशिवनगर याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केले आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास आणखी एखादे लसीकरण केंद्र उभारणेत येईल. 

यावेळी श्री. मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपरिषदेचे मागणीप्रमाणे मलकापूर शहरास 2 लसीकरण केंद्र मंजूर झाली असून एक केंद्र भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय, मलकापूर व दुसरे केंद्र प्रेमलाताई चव्हाण महिला विकास केंद्र गणेश कॉलनी, आगाशिवगर या ठिकाणी सुरु राहणार असून लसीकरण केंद्रांची वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 पर्यंत सुरु राहणार असून आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी लस उपलब्धतेनूसार लसीकरण केंद्र सुरु असणार असून याकरीता नागरीकांनी मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी आशा सेविकांमार्फत आपल्या नावाची नोंदणी करावी व याकरीता सोबत आधारकार्ड व मोबाईल सक्तीचा राहणार आहे. लस घेणाऱ्या लाभार्थ्याने उपाशी पोटी येवू नये तसेच ज्या नागरीकांना बी.पी. शुगर, दमा इत्यादी आजार आहेत. त्यांनी याबाबतची कल्पना लसीकरण केंद्रामध्ये द्यावी. याशिवाय नोंदणी होणार नाही. पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रामध्ये 300 नागरीकांनी लस घेतली असून मलकापूर शहरामध्ये 45 वर्षावरील अंदाजे 9700 पेक्षा जास्त नागरीक असून यापैकी कोणताही नागरीक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याकरीता नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी तसेच मंडल अधिकारी, स्वयंमसेवक यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त नागरीकांनी नोंदणी करुन लस देणेचे उदिष्ट ठेवले आहे. शहरातील 45 वर्षावरील कोणताही नागरीक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची पुर्ण खबरदारी नगरपरिषदेने घेतलेली आहे. याकरीता प्रभाग अध्यक्ष,नोडल अधिकारी व आशा सेविका यांची मदत घेतली जाणार आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव थांबवणेसाठी जास्तीतजास्त नागरीकांनी लस घ्यावी असे आवाहन मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, सौ. निलम येडगे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी केले त्यावेळी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शकुंतला शिंगण व नगरसेविका सौ. कमल कुराडे, सौ. गितांजली पाटील, सौ. स्वाती तुपे सौ. नंदा भोसले, सौ. भारती पाटील, सौ. आनंदी शिंदे, सौ. कमल कुराडे, सौ. पुजा चव्हाण, सौ.अलका जगदाळे, सौ. नुरजहॉन मुल्ला, सौ.निर्मला काशिद व नगरसेवक आनंदराव सुतार, किशोर येडगे, सागर जाधव, आबा सोळवंडे तसेच मंडल अधिकारी  पंडित पाटील व तलाठी सचिन निकम हे उपस्थित होते.