खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु; मायलेकाचा जळून मृत्यू: हृदयद्रावक घटना.तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा (डॉ.संदीप डाकवे) :
मोरेवाडी (कुठरे) ता.पाटण येथे एका कुटुंबातील एका 38 वर्षीय पुरुषाचा व त्याच्या 61 वर्षीय  वृद्ध आईचा प्रत्यक्षदर्शी अर्धवट जळून मृत्यू झाला असल्याची ढेबेवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.हे कसे घडले,अजून स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनानंतर याबाबी समोर येतिल पण दोघांचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे या  घटनेने वातावरण सुन्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

         ढेबेवाडी पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मयत सचिन ज्ञानदेव लोकरे व सौ.कमल ज्ञानदेव लोकरे हे मोरेवाडी येथिल लोकरेवस्ती येथे राहत होते.सचिनचे वडील ज्ञानदेव लोकरे हे आजारी असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते सचिनचा भाऊ नितीन हा त्यांच्याबरोबर कराड येथे होता.त्यामुळे सचिन व आई कमल हे दोघेजण घरी होते. आज सोमवार दि.8 मार्च रोजी त्यांच्या घराचे दार उघडले गेले नाही व घरातून धूर निघायला लागला, म्हणून ग्रामस्थ जमा झाले घर पाठीमागच्या बाजूला असल्याने लवकर काही कळून आले नव्हते. लोकांनी हाका मारल्या पण आतून काही आवाज आला नाही,यामुळे याची खबर पोलिस पाटील सविता बाजीराव सपकाळ यांनी ढेबेवाडी पोलीसांना दिली यानंतर दार उघडण्यात आले तर अर्धवट जळलेल्या व मृत अवस्थेत दोघेही दिसून आले, ढेबेवाडी पोलिसांनी हे मृतदेह कराड येथे शवविच्छेदनासाठी नेहले आहेत दरम्यान ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार यांना विचारले असता अजून नेमके कारण समजले नसल्याचे सांगितले याशिवाय सचिनची कोरोना चाचणी घेण्यात आली होती त्याचा रिपोर्ट आज सकाळी मिळाला असून तो निगेटिव्ह आला आहे. या घटनेचे नेमके कारण काय याचा तपास चालू आहे.असे ते म्हणाले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोकराव थोरात यांनी भेट दिली.घटना पाहण्यासाठी परिसरातील लोक येत होते व हळहळ व्यक्त करीत आहेत.