जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्पंदन’ च्या वतीने महिलांचा सन्मान


सौ.सुवर्णा देसाई यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने महिलांना ‘स्पंदन-नारीरत्न पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. आकर्षक सन्मानपत्र, स्पंदन दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप होते. विशेष म्हणजे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही मोठा कार्यक्रम न करता सत्कारमुर्ती महिलांच्या घरी जावून हा सन्मान केला गेला.

प्रा.डाॅ.कोमल कुंदप, सौ.सुवर्णा देसाई, कृषीभूषण कुसूमताई करपे, सुजाता आत्माराम भुलूगडे यांना प्रत्यक्ष भेटून स्पंदन-नारीरत्न पुरस्कार’ देण्यात आला तर उर्वरित महिलांना आॅनलाईन सन्मानपत्र दिले गेले.

यामध्ये सुप्रसिध्द पाश्र्वगायिका कविता राम, शीतल करदेकर, निशा परुळेकर, राजश्री परुळेकर, निकीता सावंत, रेश्मा साळुंखे, अश्विनीताई वेताळ-पाटील, अश्विनी पवार, ऐश्वर्या कदम, मेघा डोळस, वंदनाताई बामणे, सुमन डाकवे यांना आॅनलाईन सन्मानपत्र पाठवून त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्यात आली. या महिलांनी आपल्या कर्तृत्वामुळे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच कोरोना काळात त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा असा हेतू हा कार्यक्रम घेण्यामागे होता असे मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, महालक्ष्मी शिवण क्लास च्या विद्यार्थिनी सौ.सविता साठे, सौ.काजल पवार, सौ.शितल लाहीगडे, सौ.संगिता सुर्यवंशी, कु.सानिका ताईगडे, फोटोग्राफर अनिल देसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. घरी जावून महिलांचा गौरव केल्यामुळे महिलांच्या घरातील सर्व कुंटूंबीय यांनादेखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला आला. नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अग्रेसर आहे. महिलांच्या अनोख्या पुरस्कार सोहळयाच्या कार्यक्रमामुळे त्यात आणखी भर पडली. ट्रस्ट च्या या उपक्रमाचे सर्व महिलांनी कौतुक केले.