सोशल मीडियामुळे कंबरडे मोडलेला प्रिंटिंग व्यवसाय कोरोनामुळे आणखी आर्थिक संकटात.
शिराळाा|कृष्णाकाठ वृत्तसेवा : सोशल मीडियामुळे कंबरडे मोडलेला प्रिंटिंग व्यवसाय कोरोनामुळे आणखी आर्थिक संकटात सापडला आहे . पहिल्या लॉकडाउनमधून सावरतोय तोपर्यंत दुसऱ्या लॉकडाउनची शक्यता असल्याने निम्म्यावर आलेला व्यवसाय आता पाच ते दहा टक्क्यांवर आला आहे . प्रशासनाने कोरोना संसर्ग प्रतिबंध उपयासाठी नियमावली केल्याने सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा , शाळा महाविद्यालय , लग्नकार्य यावर मर्यादा आणल्याने लग्नपत्रिका , नियतकालिके , बिलपुस्तक , कार्यालयीन साहित्य , प्रचार साहित्य याची मागणी पूर्णपणे थांबली . यासंबंधित तालुक्यात , , शहरात असणारे व्यावसायिक देशोधडीला लागलेत . लग्नाचा हंगाम या व्यवसायाकरिता खूप महत्त्वाचा असतो , मात्र वार्षिक लाखोंची उलाढाल असलेल्या या व्यवसायला कोरोनामुळे गेली वर्षभर घरघर लागलेली आहे . त्यातच दुसऱ्या लॉकडाउनच्या शक्यता आणि रोज वेगवेगळ्या अटी व्यवसायासनवीन अडसर बनत आहेत . सभा , सार्वजनिक कार्यक्रम यांना बंदी घातली आहे . व्याख्यानमाला , जत्रा , महोत्सव साजरे होणार नाहीत . त्यामुळे यासाठी लागणाऱ्या निमंत्रणपत्रिका छापल्या जाणार नाहीत . छापील उत्पादनाचा वापर कोरोना काळात एकदम थंडावला आहे . त्याचा थेट फटका प्रिंटिंग व्यवसायाला बसला आहे . लग्नपत्रिकेच्या छपाईची मागणी पाच ते दहा टक्क्यांवर आली आहे . व्हॉट्स अॅप व फेसबुकच्या माध्यमातून लग्नपत्रिका व हसतलिखित बिल व पाठवण्यावर जास्त भर दिला जात असल्याने हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कामे मिळत आहेत . 10 छपाईची प्रेस शहरात आहेत . यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवरही गदा आली आहे .
____________________________________

पूर्वी २०० ते ५०० च्या पटीत लग्नपत्रिका , कार्यालयीन साहित्य यांची मागणी होती . सोशल मीडिया , व्हॉट्स अॅप आणि कोरोनामुळे फक्त मंदिरात देवास , कार्यालयीन रजा , रजिस्ट्रेशनसाठी १० ते १५ पत्रिकेची मागणी होत आहे . त्यामुळे ग्राहक कमी झाला आहे . 

प्रताप कदम, प्रितीराज प्रेस शिराळा