समन्वय समितीवर मारुतीराव मोळावडेंची नियुक्‍ती

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:  
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) सदस्यपदी ढेबेवाडी विभागातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व मारुतीराव मोळावडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मोरेवाडी (कुठरे, ता. पाटण) हे त्यांचे मूळगाव असून, तेथील ग्रामपंचायतीचे ते सदस्यही आहेत. यापूर्वी उपसरपंच म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मोळावडे हे २० वर्षांपासून सहकार क्षेत्रात असून, तळमावले येथील जनसहकार निधी लिमिटेड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही सध्या ते कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 
या निवडी नंतर मोळावडे यांनी कृष्णाकाठ शी बोलताना सांगितले कि दिलेल्या या सुवर्ण संधीचे निश्‍चितपणे सोने करीन व सोपविलेल्या जबाबदारीची पोच उत्तम कामगिरी बजावून देणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले.