स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम.




प्रत्यक्ष कृतीतून पक्षाबद्दल भूतदया व्यक्त करण्याचा हरित सेनेच्या या उपक्रमाचे कौतुक.



उंडाळे : पक्षासाठी पाणी, चिमण्या साठी घरटी. समवेत हरित सेनेचे विद्यार्थी, तसेच संस्थेचे संचालक ॲड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर, जगन्नाथ माळी, शंकर आंबवडे, धनंजय पवार आदी  (छायाचित्र:प्रदिप ओंबासे)


उंडाळे| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
उन्हाच्या प्रचंड तडाख्याने पक्षांना होणारा त्रास लक्षात घेऊन व जागतिक चिमणी दिन याचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी निसर्गात शाळेच्या परिसरात ठिकाणी पाणी, खाद्याची सोय उपलब्ध केले आहे, प्रत्यक्ष कृतीतून पक्षाबद्दल भूतदया व्यक्त करण्याचा हरित सेनेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. निसर्गात पाणी कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे माणसाबरोबर पशुपक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहे. पाण्याअभावी पक्षी धडपडताना दिसत आहेत. सध्या शिवारात पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पक्ष्यांना खाद्य ही मिळत नाही. पक्षांची अवस्था पाहून त्यांच्यासाठी निसर्गात पाणी व खाद्य ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत येथील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडावर प्लास्टिकची भांडी पाणी भरून ठेवली आहेत. त्या बरोबर घरातील तुळ्या आणि छतावर पाणी ठेवण्याबरोबरच ज्वारीची कणसे लटकवून ठेवली आहेत. जेणेकरून पक्षांना तिथे सहज पोचता येईल त्याबरोबर विद्यालयातील हरित सेनेचे समन्वयक जगन्नाथ माळी व धनंजय पवार यांनी परिसरातील विविध गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी व खाद्य खाद्य अन्नासाठी दोन दोन प्लास्टिकची भांडी दिली आहेत. त्यांच्या गावांमध्ये पक्षांसाठी सुविधा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पक्षांना पाणी व अन्न मिळू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशाप्रकारे हरित सेनेच्या वतीने पाण्यासाठी पंचवीस भांडी, पाईप पासुन बनवलेली वीस चिमण्यांची घरटी, अन्न, पाणी, निवारा ची सुविधा निर्माण केली आहे. प्रतिवर्ष चिमणी दिनाच्या निमित्ताने हरित सेनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो. याबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य बी. पी मिरजकर म्हणाले उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना खाद्य, पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्या पक्षांचे तडफड होत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडे खिडक्या अशा ठिकाणी पाणी, खाद्य ठेवल्याने पक्ष्यांची सोय झाली असून परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे बरोबर विद्यार्थ्यांना पशु पक्षाबद्दल प्रेमाची भावना जागृत होण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी शंकर आंबवडे प्रदीप ओंबासे, रवींद्र भोये, आर. जी. सुतार, संभाजी खोचरे, सूर्यकांत कणसे, श्री बाबर, संजय पाटील, महेंद्र आंबवडे यांचे सहकार्य मिळाले.