एकरकमी फि भरायला लावणाऱ्या शाळेवर कारवाई करा डॉ.गिरीष देशपांडे यांची मागणी


कराड : नायब तहसिलदार आनंद देवकर यांना निवेदन देताना डॉ.गिरीष देशपांडे व पंढरीनाथ माने.

कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
 लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासुन शाळा बंद असतानाही शिक्षण मंडळ कराड संचलित इंग्लिश मिडीयम स्कुलने 2 हजार रूपयांची सुट देतो पण एकरकमी फि भरा असे आदेश दिल्याने सर्वसामान्य पालक अडचणीत आले आहेत. या विरोधत प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पालक डॉ.गिरीष देशपांडे यांनी केली आहे. 
याबाबत नायब तहसिलदार आनंद देवकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर पंढरीनाथ माने व राजीव शहा यांच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रत गटशिक्षण अधिकाऱयांना देण्यात आली आहे. निवेदनात म्ह्टल्याप्रमाणे शहरातील थोर विभुतींनी शिक्षण मंडळ कराडची स्थापना केली. कै.डॉ.रा.गो.प्रभुने सरांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आयुष्यभर काम केले. अशा संस्थेच्या संचालकांनी किमान सध्य स्थितीतील पालकांच्या अर्थीक परीस्थीतीचा विचार करून फि बाबत निर्णय घेणे आवश्यक होते. 
 गेली वर्षभरापासुन शाळा बंद आहेत.. अशावेळी ऑनर्लान शिक्षणाज्च्या नावाखाली खाजगी शाळा फि वसुल करीत आहेत. फि वसुलिबाबत शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिलेला नाही. लॉकडूनमुळे सर्वच उद्योग धंदे बंद असल्याने सर्वच स्तरातील लोक अर्थीक दृष्या अडचणीत आले आहेत. अशावेळी सामाजीक भान जपत शाळांनी फि माफी किंवा कमी फी घेण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे. किमान ज्या पालकांना एकरकमी फि भरणे शक्य नाही. अशा लोकांना टप्प्या टप्प्याने फि भरण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते. 
 अशा परीस्थीतीत आजुनही कोरोनाचा आहाकार सुरू असताना शिक्षण मंडळ कराडच्या संचालकांनी मात्र शिक्षकांच्या पगाराचे कारण सांगत 2 हजार रूपयांची सुट देतो पण एकरकमी फि भरा असा आदेश काढला आहे. यामुळे शहरातील थोर विभुतींनी ज्या उद्येशाने शिक्षण मंडळाची स्थापना केली त्या उद्याशाला हरताळ फासण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज