कुंभारगाव सरपंच यांच्याकडून सामजिक समस्येची तातडीने सोडवणूक . ग्रामस्थांनी केले कौतुक.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव मान्याचीवाडी येथील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच्या वॉलमधून गळती होत होती याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द होताच कुंभारगावच्या सरपंच सौ.सारिका पाटणकर यांनी या समस्येची तातडीने दखल घेवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ताबडतोब पाण्याची गळती होत असलेल्या ठिकाणी पाठवून पाहणी करून घेतली असता वॉल खराब झाला आहे हे समजले कर्मचाऱ्यांना संबंधित वॉलची दुरुस्ती करण्यास सांगितली. त्यावेळी सरपंच म्हणाल्या की या विहरीवरील वॉल मधून होत असलेली पाण्याची गळतीबाबत ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आणि मान्याच्यावाडीतील ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार केली नव्हती त्यामुळे हे काम होऊ शकले नाही.जर गावातील सर्व वाड्यावस्तीमध्ये कोणाला काही अडचणी आल्या तर ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा किंवा मला माझ्या मोबाईल नंबर वर फोन करावा.