खाशीबाई बोत्रे यांचे निधन
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मान्याचीवाडी गुढे (ता.पाटण) येथील श्रीमती खाशीबाई महादेव बोत्रे यांचे मंगळवार दि. 23 मार्च, 2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी दोन मुले, तीन मुली, नातवंडे आणि परतवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य कापड आणि माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे संस्थापक/सरचिटणीस आबासाहेब बोत्रे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांचा रक्षाविसर्जन विधी गुरुवार दि. 25 मार्च, 2021 रोजी सकाळी 9 वाजता मान्याचीवाडी गुढे ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.