केंद्रप्रमुख संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष पदी अनिल कदम यांची नियुक्ती

सातारा|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शन नुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष पदी अनिल बुवासाहेब कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य अध्यक्ष अरुण मडके यांनी सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष पदी अनिल कदम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र लिहून नुकतेच पाठवले आहे.जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवडीचे अधिकार सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांना देण्यात आले आहेत.तरी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर,वाई, जावली,पाटण,कराड, खटाव, कोरेगाव, सातारा,फलटण, खंडाळा,माण तालुक्यातील केंद्रप्रमुखांनी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मध्ये सहभागी होण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा.असे आवाहन नुतन सातारा जिल्हा शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केले आहे.

सातारा जिल्हा शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष पदी अनिल कदम यांची नियुक्ती झाली त्या बद्दल लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, अशोक बेलसरे,नवनाथ गेंड,अरुण मडके, गजानन शिंदे,दादा चोरमले, प्रमिला रणवरे यांनी अभिनंदन केले आहे.