श्री.बाळसिद्ध विद्यालयात जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा.


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  श्री.बाळसिद्ध विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात अंगणवाडी च्या शिक्षिका नजमा इनामदार,सुशिला माने,पल्लवी साळुंखे,पुष्पा माने,रेखा पाटील,संगिता शेवाळे,रेखा पाटील,मुमताज शेख,सुनिता भेदाटे या कार्यक्रमात निमंत्रित होत्या.

        कोरोना काळात अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी जिवावर उदार होउन केलेले कुटुंब सर्वेक्षणाचे, टेंपरेचर घेने, त्याच्या नोंदी करुन कोरोना योद्धा म्हणुन केलेले काम वाखानन्या योग्यच आहे.म्हणुन जागतिक महिला दिनी या महिलांना श्री.बाळसिद्घ विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयातील मुलींना ही गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कु.सानिका शेवाळे,प्रणाली जाधव या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.संगिता शेवाळे अंगणवाडी सेविका यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.श्री.शंकर पाटील (आबा) संचालक ग्रामीण विकास शिक्षण संस्था ,उंडाळे यांनी अध्यक्षीय भाषण केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री.बाळसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .हणमंत सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमात सरस्वती पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रसंगी रविंद्र पाटील, भीमराव भोसले, सानिका काळे, सानिका तांबेकर, सानिका साळुंके ,समृद्धी पाटील ,साक्षी साळुंखे ,पल्लवी शेवाळे, मधुरा काळे, कोमल पाटील ,आर्यन सूर्यवंशी ,तुषार पाटील, प्रथमेश भावके ,अतिश माने उपस्थित होते.

       प्रस्ताविक हणमंत सूर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन बालाजी मुंढे यांनी व आभार सानिका शेवाळे यांनी मानले.