कुसूर परिसरात ‘फड’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु


तळमावले|डाॅ.संदीप डाकवे :
कराड तालुक्यातील कुसूर परिसर निसर्गरम्य विविधतेने नटल्याने मराठी सिनेसृष्टीला भुरळ पाडत आहे. वेबसिरीज बरोबर मराठी चित्रपट दिग्दर्शकांची पावलेदेखील या परिसराकडे वळू लागली आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नवीन कलाकारांना संधी मिळू लागल्याने त्यांच्यात दडलेल्या कलाकारीला व्यासपीठ मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


तपोभूमी प्राॅडक्शन आणि अविराज फिल्म एंटरटेनमंेट निर्मित ऊसतोड मजूरांच्या जीवनात येणाÚया विविध समस्यांवर डोळसपणे प्रकाश टाकत आहे. शेतकरी कुटूंबाताील विशाल कदम लिखित गुरुदास दिग्दर्शित ‘फड’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कुसूर परिसरात झाला. विपुल काटेकर, मोहिते काका यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ झाला. या चित्रपटाचे निर्माते यादव, सहाय्यक दिग्दर्शक अशोक कांबळे, अतुल वाडकर, असिस्टंट डायरेक्टर चैत्राली पोतदार तर विनायक चैगुले छायाचित्रण करत आहेत. शुभारंभप्रसंगी परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

कुसूर परिसरात आतापर्यंत काळोखाच्या पारंब्या, पिकूली, भिरकीट, झाला बोभाटा इ.मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.