पुण्यातील रोहन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बहुल्यात महिलांना साड्यांचे वाटप


पुणे|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पुणे येथील रोहन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बहुले (ता. पाटण) येथ गरीब व गरजू विद्याथ्यांना शालेय गणवेश व गरीब, निराधार महिलांना साड्यांचे वाटप गावच्या सरपंच सुजाता रामचंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पानस्कर, ग्रामपंचायत सदस्य व मित्र समुहाची उपस्थिती होती.