चित्रकाराची यशवंतराव चव्हाण यांना ‘शब्दवंदना’

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :

डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्दांची गुंफण करत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना ‘शब्दवंदना’ दिली आहे. असंख्य शब्दांतून रेखाटलेली यशवंतरावांची भावमुद्रा चित्रकाराच्या कलेला दाद देण्यासारखी आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी सरंक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकेकाळी ‘हिमालयाच्या भेटीसी सहयाद्री धावला’’ असा लौकीक मिळवला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचे ‘यशवंतराव’ चव्हाण या शब्दांत सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे.

राजकारण, समाजकारण याबरोबर साहित्यावरही तितकेच प्रेम करणाÚया आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना या चित्राच्या माध्यमातून संदीप यांनी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.

अक्षरांपासून शब्दांची निर्मिती घडते आणि या शब्दांनी अनेक प्रवाह जोडले जातात. पण शब्दांपासून चित्रे साकारली तर...हो शब्दांपासून चित्रे....आपल्या जादुई चित्रकलेच्या माध्यमातून शब्दांची गुंफण करत विविध डाॅ.संदीप डाकवे हे विविध शब्दचित्रे तयार करत आहेत. आतापर्यत त्यांनी संत गाडगेबाबा, गौतम बुध्द, कर्मवीर भाऊराव पाटील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा), अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ), रा.गो.प्रभुणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेते भरत जाधव इ.सह अनेक मान्यवरांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.

 डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत खडूतन अष्टविनायक, मोरपीस व जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, अक्षरगणेश, व्यंगचित्रे, पोस्टर रेखाटन, पेपर कटींग आर्ट, रांगोळी रेखाटन, पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, एक दिवा जवानांसाठी, अक्षरातून विठ्ठल कलाकृती, भिंतीवर वारीचे चित्र, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, छत्रीद्वारे व्यसनमुक्तीचा प्रयत्न, सर्वात मोठी ‘प्रतिबिंब’ भित्तीपत्रिका, जटानिर्मूलनासाठी प्रयत्न, शैक्षणिक संस्थामधून कलाप्रदर्शने, चारोळी-कविता लेखन, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा, 54 चित्रांची मालिका असे विविध उपक्रम राबवले आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 7000 हून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, खेळाडू, पत्रकार, प्रशासनातील दिग्गज व्यक्ती तसेच सेलिब्रिटी यांना त्यांची हुबेहुब व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना ‘सरप्राईज’ भेटी दिल्या आहेत.

त्यांच्या या छंदाची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’, आणि ‘हायरेज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. डाॅ.डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांची आतापर्यंत 4 पुस्तके प्रकाशित झाली असून 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यामध्ये आपले वेगळेपण सिध्द केले आहे. महाराष्ट्र राज्य शासन दरबारी 4 वेळा तर विविध संस्थांकडून सुमारे 37 हून अधिक पुरस्कार देवून गौरव झाला आहे.

केवळ चित्र न रेखाटता डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत नाम फाऊंडेशन, केरळ पुरग्रस्त, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज, माजी सैनिक हणमंतराव पाटील, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19, इशिता पाचुपते, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, भारत के वीर इ. साठी भरीव निधी देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

जास्तीत जास्त दिग्गज व्यक्तिमत्त्वांना त्यांची व्यक्तिचित्रे भेट देवून त्याची नोंद जागतिक स्तरावर ‘गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड’, ‘लिम्का बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच चित्रे भेट दिलेल्या निवडक व्यक्तींचे फोटो, आॅटोग्राफ, व्यक्तिचित्र असलेले आगळेवेगळे पुस्तक तयार करण्याचा मानसही त्यांनी केला आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांचेककडून यापुढेही विविध चित्रांची ‘सही रे सही’ गुंफण होत राहो याच शुभेच्छा.