अर्थ व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सव्वा बारा तास विधानपरिषदेमध्ये सक्रीय.सकाळी 10 ते रात्री 10.15 पर्यंत सांभाळले विधानपरिषदेचे कामकाज.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्याचे गृह, अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन अशा पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या कामांचा आवाका यामुळे खुप वाढला आहे.सध्या मुंबई येथे राज्याचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.08 मार्च रोजी विधानपरिषद सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर दि.09 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा.पर्यंत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेकरीता तसेच मविस नियम 260 अन्वये कायदा व सुव्यवस्थावरील चर्चा असल्याने सलग सव्वा 12 तास विधानपरिषद सभागृहात सक्रीय राहून सभागृहाचे शासनाच्या वतीने कामकाज सांभाळले. वेळेचे बंधन न पाळता कामांमध्ये स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री म्हणून विधानपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंचे विशेष कौतुक केले आहे.

         दि.08 मार्च रोजी महाराष्ट्र विधीमंडळात राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर झालेनंतर दि.09 व 10 मार्च रोजी या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा ठेवण्यात आली आहे. त्यातच अधिवेशनाचे शेवठचे दोन दिवस बाकी राहिल्याने विधानपरिषद सभागृहात मविस नियम 260 अन्वये सकाळच्या सत्रामध्ये गृह विभागाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था वरील चर्चा विरोधी पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती.कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये विधानपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवर सदस्यांनी सहभाग घेवून आपले म्हणणे मांडले. या सर्व मान्यवर सदस्यांनी कोणकोणते मुद्दे या चर्चेमध्ये मांडले याची सर्व नोंद राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री म्हणून स्वत: ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून घेतली. 

           अनेकदा गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री हे विधानसभा सभागृहात असल्याने विधानपरिषदेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी ही गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईवर येते. गृह,अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे अभ्यासू आणि हजरजबाबी राज्यमंत्री असल्याने ते नेहमीच विधानसभा असो वा विधानपरिषद सभागृहामधील कामकाज ते तितक्याच अभ्यासूवृतीने लिलया पेलतात.गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांच्या अनुपस्थितीत विधानपरिषद सभागृहातील कामकाज विरोधी पक्षाच्या बाजूने कसलाही दंगा होवू न देता शासनाच्या वतीने आपली भूमिका मांडून ना.शंभूराज देसाई योग्यरित्या सांभाळून नेतात व त्यांना दिलेल्या खात्यांच्या बाजूने अतिशय चांगल्या प्रकारे खिंड लढविण्याचे काम करुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या कौतुकास पात्र ठरतात हे अवघ्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. त्यांच्या या कामकाजावर गृह व अर्थ विभागाचे कॅबिनेट मंत्री यांनी अनेकदा त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

             काल दि.09 रोजी कायदा व सुव्यवस्थावरील तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेवेळी ना.शंभूराज देसाईंनी सकाळी 10 ते रात्री 10.15 वा पर्यंत सलग सव्वा 12 तास सभागृहात बसून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे अतिशय शांतपणे एैकून घेतले त्यांचे मागणीतील मुद्दे सभागृहात उपस्थित राहून नोंद करुन घेतले यावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी वेळेचे बंधन न पाळता कामात स्वत:ला वाहून घेणारा राज्यमंत्री महाविकास आघाडीला ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने मिळाला आहे अशाप्रकारे त्यांच्या या कार्याचे तोंडभरुन कौतुक करीत हे कौतुक अनेक सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंना बोलून दाखविले.