श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिर श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा तसेच रोटरी क्लब ऑफ कराड व ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरामध्ये कर्करोग या आजाराची चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये कर्करोगाचे निदान तसेच कर्करोग होऊ नये यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपचार या संबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

 या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर या हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश गरुड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

  सदर शिबिरामध्ये सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. घोगाव, उंडाळे व या परिसरातील सर्व गावे, वाड्या येथील लोकांनी या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव प्रसुन जोहरी, संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर कोगळूनकर, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर च्या डॉ. संगीता पाटील, रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष गजानन माने यांनी केले आहे.