मुंबई अग्निशमन दलाचे खासगीकरण वाहन चालक भरती कंत्राटी पद्धतीने



मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : काळबादेवी येथील आगीच्या घटनेनंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या शिफारशी नुसार आता मुंबई अग्निशमन दलाचेही खासगीकरण होणार आहे. कारण  या अग्निशमन दलामध्ये जीप आणि हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी पध्दतीने ५४  वाहनचालकांची भरती केली जाणार आहे.

काळबादेवीमध्ये लागलेली आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती . या समितीने रुग्णवाहिका व अग्निशमन दलातील हलकी ,लहान वाहने चालविण्यासाठी खासगी वाहनचालकांची नेमणूक करण्याची शिफारस केली होती.१० रुग्णवाहिका आणि नवीन अग्निसुरक्षा पालन कक्षातील २४ जीप चालविण्यासाठी एकूण ८४ खासगी चालकांची नियुक्ती करण्याची ही शिफारस होती .मात्र त्यापैकी ५४ खासगी चालकांचीच गरज लक्षात घेऊन त्यासाठी आता निविदा मागविण्यात आल्या आहेत. वास्तविक , मुंबई अग्निशमन दलामध्ये एकूण ६६५ यंत्रचालक पदे असून यातील ५०७ पदे भरली असून असून १५८ पदे रिक्त आहेत .