वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त तळमावले येथे रक्तदान शिबिर संपन्न

मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि. शेती सह. क्रेडिट संस्था मर्या; तळमावले, ढेबेवाडी पोलीस ठाणे,श्रध्दा हॉस्पिटल तळमावले यांच्या संयुक्त विध्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.




तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तळमावले भागात रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त ढेबेवाडी पोलीस विभाग ,मर्चंट सिंडिकेट क्रेडिट संस्था व श्रद्धा हॉस्पिटल तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       पाटण तालुक्यातील तळमावले येथे ढेबेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह अंतर्गत मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती क्रेडिट संस्थेचे चेअरमन श्री अनिल शिंदे यांनी हा कार्यक्रम अयोजित करत श्रद्धा हॉस्पिटल तळमावले, व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

     रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त चालक हा वाहतूक व्यवसायचा कणा आहे,चालक सुरक्षित व आरोग्यदायी राहण्यासाठी वाहन चालवताना मद्यपान न करता,वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर अपघाताचे नियंत्रण हे कमी होईल तसेच चालकांनी अतिवेगाने वाहने न चालवता नियमांचे योग्य रीतीने पालन करावे असे आव्हान ढेबेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत या कार्यक्रमात करण्यात आले.तसेच भागातील 40 रक्तदात्यांनी रक्त दान करत नवी संजीवनी दिली.

     या कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ.चंद्रकांत बोत्रे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.  या वेळी डॉ.सुभाष ताईगडे, सरपंच भगवान मोरे मोरेवाडी, संस्थेचे व्हा चेअरमन राजेश करपे, संचालक ज्ञानदेव जाधव, महेश कोकाटे,भिमराव जाधव, शिवाजी देसाई, सुरेश देसाई, डॉ.जगताप, सुनिल पांढरपट्टे, सपकाळ सर, शंकरराव पवार, संदीप पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सागर नलवडे, संजय भुलूगडे, श्रीरंग चाळके, किशोर शेलार, आतिकेश पवार, पप्पू पाटील, प्रदीप पाटील, रणजित पवार, मारुती मोळावडे, अरुण मोळावडे, आत्माराम मोळावडे, हणमंत मोळावडे, प्रवीण कदम पोलीस हवालदार श्री अजय माने , पोलीस पाटील नितीन पाटील ,प्रवीण मोरे व मर्चंट सिंडिकेट संस्थेचे पदाधिकारी व तळमावले येथील ग्रामस्थ व व्यापारी वर्ग उपस्थित होते.