सौ.रेश्मा डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार जाहीर


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून कार्यरत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टनेे विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. या ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा संदीप डाकवे यांना माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 4 वर्षापासून कार्यरत आहे. 4 मे, 2017 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा या ठिकाणी ट्रस्टने अधिकृत  नोंदणी केली आहे. दिव्या फाऊंडेशन बुलढाणा यांच्यावतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना पुरस्कार जाहीर केले आहेत. सामाजिक क्षेत्रातील नामांकनामधून सौ.रेश्मा डाकवे यांची पुरस्कारासाठी अंतिम निवड झाली आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनी हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दिव्या फाऊंडेशनचे अशोक काकडे यांनी दिली आहे.
अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. ट्रस्टच्या या कार्याची दखल घेत ट्रस्ट च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांना  माॅंसाहेब जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा सोमवार दि.8 मार्च, 2021 रोजी गर्दे वाचनालय बुलढाणा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

---------------------------------------------------------------
पुरस्काराने जबाबदारी वाढली:
या पुरस्कारामुळे ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. तसेच यामुळे समाजात यापुढे काम करताना आणखी जबाबदारीने काम करावे लागेल. स्पंदन ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. माॅंसाहेब जिजाऊ पुरस्कारामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे, अशी भावना ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांनी व्यक्त केली आहे.