माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून शिंगणवाडी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रु च्या मंजूर निधीतून शिंगणवाडी येथील कोळे स्टँड ते जिजामाता अनाथ आश्रम इथपर्यंत रस्त्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन पृथ्वीराज बाबांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, गजानन आवळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिंगणवाडी गावचे सरपंच विकास शिंगण, कोळे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत चव्हाण, सुधीर चव्हाण, महादेव शिंगण, आंबवडेचे विलासराव पाटील, गणेश शिंगण, किशोर शिंगण, आबाजी शिंगण, मयूर शिंगण, सौ आक्काताई विलास शिंगण, उज्वला शशिकांत शिंगण, गणेश शंकर शिंगण, जगन्नाथ लोकरे आदी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.  

  याप्रसंगी युवानेते इंद्रजीत चव्हाण म्हणाले कि, माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील विकास कामांच्यासाठी कायमच प्राधान्य दिलेले आहे. सार्वजनिक व लोकोपयोगी कामामध्ये स्वतःला झोकून देणारा नेता आपल्याला लाभला आहे यामुळे कराड दक्षिणेची जनता पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी कसा असावा, तो मतदारसंघाच्या विकासासाठी किती निधी खेचून आणू शकतो हे मागील ६ वर्षात जनतेने पाहिले आहे.

यावेळी शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, सरपंच विकास शिंगण आदींची भाषणे झाली.