मातृभाषा संवर्धन काळाची गरज : जयप्रकाश माने

घोगावला श्री बाळसिद्ध विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप.


उंडाळे|प्रतिनिधी:
मातृभाषा संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जय प्रकाश माने यांनी केले. घोगांव येथील श्री बाळसिद्ध विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप समारंभ झाला याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री माने बोलत होते. ओम शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेज चे संस्थापक संजय भावके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेचे संचालक शंकरराव पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक हणमंतराव सूर्यवंशी हे उपस्थित होते यावेळी श्री माने म्हणाले विद्यालयाचे अनोखे उपक्रम ग्रामस्थांना खूप भावतात शाखाप्रमुख हनुमंत सूर्यवंशी हे सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे सर्व विभागाला गती मिळत आहे. शाळा आय. एस. ओ. तसेच भविष्यकालीन आदर्श देशाचे रत्ने घडवणारे दालन करण्याकामी सर्वतोपरी मदत करू. संजय भावके म्हणाले शाळेचा आय एस ओ साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. संचालक शंकरराव पाटील, तानाजी माने, ज्ञानेश भावके, मुख्याध्यापक हनुमान सूर्यवंशी, यांची भाषणे झाली. या दरम्यान विद्यार्थ्यांनी नाटिका, एकांकिका, एकपात्री प्रयोग, पोवाडा, भक्ती गीते, विनोद, चारोळ्या, कविता, शेर शायरी इत्यादी लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन दिनकर आंबवडे यांनी, केले. हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. दिनकर आंबवडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बालाजी मुंडे यांनी आभार मानले. गणेश तपासे, सचिन चव्हाण, रवींद्र पाटील, भीमराव भोसले, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.