कुंभारगाव विभागात कोरोनाचा पुन्हा प्रवेश.  कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा : कुंभारगाव ता पाटण येथून जवळच शेंडेवाडी येथील 70 वर्षीय महिलेस कोरोनाची लागन. येथील एका महिलेला सर्दी, व खोकला याचा त्रास होत होता त्यासाठी त्या महीलेस तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याची कोरोना टेस्ट केली असता ही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना कराड येथील कॉटेज हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

       तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी श्रीमती ए एम कांबळे, श्री रोहीत भोकऱे श्री एस आर कांबळे, सुप्रिया यादव व्ही जी फाळके, डॉ खबाले आशा सेविका रूपाली मोरे, पोलीस पाटील प्रवीण मोरे, संतोष पवार यांनी शेंडेवाडी येथील पवार वस्तीला भेट दिली. या वेळी कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील आठ जणांना होम क्वारनटाइन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून 2 दिवसात शेंडेवाडी येथे कोरोना तपासणी कॅम्प घेणार असून, आरोग्य विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, मास्क चा वापर करा,स्वतःची काळजी घ्या, "माझे कुटूंब माजी जबाबदारी " याचा सर्वानी अवलंब केल्यास आपण सर्व जण पुन्हा कोरोना वर मात करू शकू.