शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.

 


कुभारगांव कृष्णाकाठ वृत्तसेवा :  शेंडेवाडी ता पाटण येथे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोना चाचणी कॅम्प.       

कुंभारगाव ता पाटण येथून जवळ असणाऱ्या शेंडेवाडी येथे काही दिवसापूर्वी एक महिला पॉजिटीव्ह आल्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून या रूग्णांच्या संपर्कातील  एकूण 38 जणांची RTPCR, तपासणी करण्यात आली.   यामध्ये आज 58 वर्षीय पुरुष व 65, वर्षीय महिला, यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. कोरोनाने पुन्हा एकदा विभागात प्रवेश केला आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली व कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू  शकतो .  



या कॅम्प साठी तळमावले प्राथमिक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ यू जी गोंजारी, डॉ ए एम खबाले, आरोग्य सहाय्यक जे, एफ पावरा, आरोग्य सेविका, ए एम कांबळे, आरोग्य सेवक,  रोहीत भोकरे,  व्ही जी फाळके, स्वप्नील कांबळे, सामुदायिक आरोग्य अधिकारी नितीश माने, अकबर मुल्ला,धैर्यशील सपकाळ,सुप्रिया  यादव आशा सेविका रूपाली मोरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, पवार सर, प्रवीण मोरे, यांचे सहकार्य लाभले.