स्वानंद कुलकर्णी यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट पदवी.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, घोगांव ता.कराड येथील प्राचार्य स्वानंद बा. कुलकर्णी यांना पुणे विद्यापीठातर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग, या शाखेतील Ph.D. नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील संशोधन केंद्रांमधून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून "Effective Use of Bio-oil obtained by Pyrolysis of Municipal Solid Waste, in Flexible Pavement" या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे.

      म्युनिसीपल कचरा व त्यातील विशेषतः प्लास्टिक कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाची हानी वाढत आहे. स्वानंद कुलकर्णी यांनी केलेल्या संशोधनामध्ये कचऱ्यातील प्लास्टिक मधून पायरोलिस पद्धतीने ऑईलची निर्मिती करून त्याचे डांबरी रस्त्याच्या कामांमध्ये वापरण्याचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले आहेत.
      सदर संशोधनामध्ये कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेचे विभागप्रमुख प्रा.डॉ.एम.एस. रणदिवे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले तसेच मेटलर्जी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एन.बी. ढोके, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.डॉ.एस.डी.कुलकर्णी तसेच पुणे विद्यापीठातील डॉ.जयंत गाडगीळ यांचेकडून वेळोवेळी तांत्रिक सुचना मिळाल्या.
  आय.आय.टी रूरकी येथील डॉ. प्रवीणकुमार हे परीक्षक म्हणून लाभले व त्यांनी या संशोधन विषयाचे विशेष कौतुक केले.
   या संशोधन कार्यात हेमंत हाडूळे,ऋषिकेश शहाणे,  राजीव खाडे, बारी, हणवते,  बीडकर यांचे सहकार्य झाले. तसेच स्वानंद कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी कुलकर्णी यांची त्यांना या कामांमध्ये अमूल्य साथ मिळाली.
    स्वानंद कुलकर्णी यांनी १२ वर्षे किर्लोस्कर कोपलॅड लि. या कंपनीत काम केले आहे व सहा ते सात वर्षे स्वतंत्र व्यवसाय केला आहे . 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केल्यामुळे  पी.एच.डी करण्याची संधी मिळाली व संस्थेकडून प्रोत्साहन मिळाले त्यामुळे डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले . 

त्यांच्या या यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.