विद्यार्थ्यांनी केले वानराचे अंत्यसंस्कार .
श्री बाळसिद्ध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन. विद्यार्थ्यांचे सामाजिक स्तरातून कौतुक.
उंडाळे दि. कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री. बाळसिद्ध विद्यालय, घोगाव येथील विद्यालय परिसरात अचानक एका वानराच्या पाठीमागे पाच कुत्री लागलेली होती .कळप सोडून चुकलेला वानर शाळेच्या पाठीमागील शेतातुन जात असताना पाच कुत्र्यांनी वानरावर हल्ला चढवला कुत्र्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वानर आटोकाट प्रयत्न करत होते मात्र कुत्र्यांनी त्यास जेरीस आणले. हे दृश्य खिडकीतून विद्यार्थ्यांनी पाहिले शिक्षकांच्या अनुमतीने मुलांनी घटनास्थळी धाव घेऊन वानरास कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.जखमी झालेल्या ठिकाणी हळद लावून वानरास सोडून दिले .

      आज शिवजयंती साजरी करण्याच्या साठी शाळेत आल्यानंतर तोच वानर शाळा परिसरात झाडाखाली मृत आवस्थेत आढळुन आला. हे पाहुन विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली व त्याचा अंत्यविधी करण्याचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ठरवले. त्यासाठी लागणारे विधिचे साहित्य नवीन पांढरा व भगवा कपडा, अगरबत्ती, गुलाल हे साहित्य राधाकृष्ण वस्त्रभंडार ,उंडाळे येथुन श्री.रमेश शेवाळे यांनी पाठवून दिले.शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळुन शाळा परिसरात खोल खड्डा खोदून विधिवत सर्व काही केले.

       वानर स्मृतीत कायम रहावे या साठी त्याच जागी एका वृक्षाची लागवड करुन एक नवाआदर्श या निमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांनी घालून दिला.

      या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हणमंत सूर्यवंशी,शिक्षक श्री.भालचंद्र आंबवडे विद्यार्थी आर्यन सूर्यवंशी, विराज सूर्यवंशी,ऋषिकेश भेदाटे, ऋषिकेश मदने, साहिल सूर्यवंशी प्रथमेश भावके , आयुष माने अतिश माने , अभिराज शेवाळे हर्षल पाटील, विवेक नलवडे, मयुर पाटील,अविनाश मोहिते तसेच विद्यार्थिनी सानिका काळे,सानिका तांबवेकर,सानिका शेवाळे,सानिका साळुंखे,मधुरा काळे,साक्षी साळुंखे,पल्लवी शेवाळे,समृद्धी पाटील,प्रणाली जाधव,प्रज्ञा होगले,कोमल पाटील असे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.