इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसायटीच्या इस्लामपूर शाखेचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात पार पाडला. वर्धापनदिनानिनिमित्त हळदीकुंकू समारंभ, वेषभूषा आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास सभापती शुभांगी पाटील, आगारप्रमुख सौ.शर्मिला घोलप-पाटील, पंडित मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, महेश पाटील, शिवाजी सुर्वे, प्रा.अरुण घोडके, नानासोा सावंत, देवबा वायचळ, हेमंत तुपे, नितीन फल्ले व अन्य मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी महिलांच्यांसाठी फनी गेम्सचेदेखील आयोजन केले होते. वेषभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.प्रतिभा पाटील, व्दितीय क्रमांक शबाना मुल्ला, तृतीय क्रमांक शारदा शिंदे तर उत्तेजनार्थ मोहिनी सुर्यवंशी, मनस्वी कलेढोणकर यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.श्रध्दा कुलकर्णी, सौ.संगिता शहा यांनी केले. तसेच बाजरीच्या पिठापासून तिखट व गोड पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योत्स्ना कुलकर्णी, व्दितीय क्रमांक सावनी नांगरे, तृतीय क्रमांक निकीता थोरात तर उत्तेजनार्थ क्रमांक त्रिशा कांबळे, अनुष्का खैरे यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण सौ.प्रिया पाटील, सौ.मोनिका शिंघण यांनी केले. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शिवसमर्थ प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम धर्मे, अनिकेत पाटील, पौर्णिमा चव्हाण, राहुल लोहार, नितीन निकम, जयंत यादव, चारुशीला शिंदे, प्रणाली शेळके, अंजली मोरे, चैत्राली कणसे, पुनम कदम, कविता पाटील, इंद्रजित कणसे, अजय खडके, अभिजीत गायकवाड, अमोल जगताप व अन्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.गीता पाटील यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन चारुशीला फल्ले यांनी केले.