युवा नेते चंद्रकांत चाळके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

 

कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगाव ता.पाटण येथील युवा नेते चंद्रकांत चाळके साहेब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते .यामध्ये दि.१२ फेब्रुवारी रोजी बदलापूर येथील आनाथ आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी वस्तू ,ब्लॅंकेट, फळे वाटप ,घणसोली येथे जिद्दी मराठा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.

 कुंभारगाव,चाळकेवाडी,चिखलेवाडी परिसरातील गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
 
यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत चाळके  यांनी सातत्याने चालविलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत त्यांचे कौतुक केले.यावेळी ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते.  त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज