योग्य वेळी तपासणी करुन औषध उपचार घेतले तर कर्करोग बरा होतो:शल्यचिकित्सक डॉ प्रकाश गरुड



श्री संतकृपा शिक्षण संस्थेत आरोग्य शिबीर संपन्न.


उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा : योग्य वेळी तपासणी करुन औषध उपचार घेतले तर कर्करोग बरा होतो असे प्रतिपादन शल्यचिकित्सक डॉ प्रकाश गरुड यांनी केले. 
घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात  परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी रोटरी इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ प्रकाश गरुड, प्राचार्य विजयानंद अरलेलीमठ, डॉ शेखर कोगनुळकर, डॉ संगीता पाटील, रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष गजानन माने, उपाध्यक्ष राजेश खराटे, रघुनाथ डुबल, यांची उपस्थिती होती.
सदर शिबिर श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा, तसेच रोटरी क्लब ऑफ कराड व ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 या शिबिरामध्ये कर्करोग या आजाराची चाचणी करण्यात आली. यामध्ये कर्करोगाचे निदान तसेच कर्करोग होऊ नये. यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपचार या संबंधी ओन्कोलाइफ च्या डॉ संगीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.तर डॉ. शेखर कोगनुळकर यांनी असह्य वेदना सहन करणार्‍या,, कर्करोग रुग्णास pain. Palliative वेदना मुक्ती कशी केली जाते याची माहिती दिली. या शिबिरात ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली
  आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर या हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश गरुड यांच्या हस्ते झाला.
  सदर शिबिरामध्ये सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत जवळ जवळ १२५ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. घोगाव, उंडाळे व या परिसरातील सर्व गावे, वाड्या येथील लोकांनी या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा शिबिराचा लाभ घेतला.
 कार्यक्रमासाठी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसुन जोहरी, संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर कोगळूनकर, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर च्या डॉ. संगीता पाटील, रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष गजानन माने, उपाध्यक्ष रो राजेश खराटे, सहसचिव रो रघुनाथ डूबल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.