खा.श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

 


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : दि.११ फेब्रुवारी २०२१ गुरुवार रोजी संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव व नवभारत पतसंस्था,तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचा शुभारंभ पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती   रघुनाथ जाधव तात्या यांच्या शुभहस्ते फीत कापण्यात आली .  

या कार्यक्रमास संजय देसाई माजी शिक्षण सभापती जि.प.सातारा , डॉ खबाले सर , अंकुश आतकरी उपसरपंच तळमावले, संजय भुलूगडे,  महादेव वरेकर , नामदेव खटावकर , माणिक खटावकर, दादासो मोरे , राजेंद्र पुजारी, तानाजी माने, पंकज कदम , बाजीराव सावंत , शामराव पुजारी , सौरभ देसाई , प्रा सचिन पुजारी सर उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी कुंभारगाव, तळमावले, साईगडे,गुढे, कुठरे, धामणी या गावातील कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडु नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत ८० युवकांनी रक्तदान केले.स्व.वेणुताई चव्हाण रक्तपेढी व स्व.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कराड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले डॉक्टर, नर्स तसेच त्यांच्या सर्व टिमचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजिवन प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन पुजारी सर, आभार संजिवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नवभारत पतसंस्थेचे चेअरमन सौरभ देसाई यांनी केले.हे शिबीर चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य व नवभारत पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांनी कष्ट घेतले.