वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली प्रतिबंधात्मक उपाययोजना.


सातारा|कृष्णाकाठ वृत्तसेवा : उन्हाळ्यात तापमान वाढून जंगलात वणवे पेटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वणवे नियंत्रण करण्यासाठी वन विभागाने उपाययोजनांना सुरुवात केली आहे.घोटील ता.पाटण या ठिकाणी . किरण कांबळे सहा.वनसंरक्षक सो.सातारा, विलास काळे वनक्षेत्रपाल, सो पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली, सुभाष राऊत वनपाल भोसगाव,जयवंत बेंद्रे वनरक्षक घोटील, अंकुश पवार वनसमिती अध्यश घोटील,संतोष पवार वन्यजीव, रमेश पवार सोसायटी माजी चेरमन, व घोटील ग्रामस्थ ,महिला यांच्या सहकार्याने घोटील ता.पाटण या ठिकाणी वन क्षेत्रात असणाऱ्या जाळरेषा घेण्यात आली

उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असते. या वाढत्या तापमानामुळे वणवे पेटण्याची शक्यता असते. त्यामुळे वन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. यंदाही वन विभागाने खबरदारी घेतली आहे. वणवे रोखण्यात जाळरेषा महत्वाच्या असतात.यावेळी मोठया संख्येने घोटील ग्रामस्थ उपस्थित होते.