प्रा.अधिकराव कणसे यांचा 9 फेब्रुवारी ला सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.












तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील प्रा.अधिकराव बाळासोा कणसे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवागौरव व ‘ज्ञानयात्री’ पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवार दि.9 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.यशवंत पाटणे (ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते), अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ सहसचिव (अर्थ), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, स्वागताध्यक्षस्थानी प्रो.(डाॅ.)सतिश घाटगे प्र.प्राचार्य, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्य सुहास साळुंखे माजी प्राचार्य, एल.बी.एस काॅलेज, सातारा, प्राचार्य डाॅ.अशोक करांडे मा.सहसचिव (प्रशासन), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, अॅड.जनार्दन बोत्रे शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार, प्रा.बाळासाहेब उर्फ व्ही.पी.पाटील माजी चेअरमन, दि रयत सेवक को.आॅप.बॅंक लि;सातारा, प्राचार्य डाॅ.जे.एस.पाटील प्राचार्य बी.बी.सावंत, डाॅ.आर.जी.पाटील, प्राचार्य आर.के.भोसले, प्राचार्य दिलीप संकपाळ, डाॅ.ए.एम.गुरव अधिष्ठाता वाणिज्य विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, प्राचार्य डाॅ.एल.जी.जाधव, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, डाॅ.सी.जी.पाटील, प्राचार्य डाॅ.विजय माने, प्राचार्य डाॅ.जे.ए.म्हेत्रे, प्राचार्य डाॅ.एस.व्ही.शेळके यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य, गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी केले आहे.