सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

 



सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 182 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 4, शहरातील प्रतापगंज पेठ 2, सदरबझार 3, रांगोळी कॉलनी 1, विक्रांतनगर 1, शाहूपूरी 1, संभाजीनगर 1, एमआयडीसी 2, मोळाचा ओढा 1, आशा भवन 1, खावली 4, लिंब गोवे 1, साबळेवाडी 1, नेले 1, मजरे पिलानी 2, 

कराड तालुक्यातील कराड 2, शहरातील कोयना वसाहत 1, रुक्मीणी गार्डन 1, शिरगाव 1, इंदोली 4, वहागाव 1, घारेवाडी 3, बेलवडे बु. 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 2, शहरातील सोमवार पेठ 1, आर्यमान हॉटेलजवळ 1, पाडेगाव 1, 

खटाव तालुक्यातील विसापूर 1, खातगुण 1, बुध 1, पुसेगाव 1, वडूज 2, जायगाव 1, कलेढोण 1, औंध 1, नडवळ 1, डिस्कळ 6,

माण तालुक्यातील वरकुटे मलवडी 1, दहिवडी 18, मोगराळे 1, वडगाव 1, गोंदवले खुर्द 1, धामणी 1, मार्डी 2, पळशी 1, 

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन 2, गुजरवाडी 1, वाठारकिरोली 7, रहिमतपूर 9, धामणेर 1, नेहरवाडी 1, बेलेवाडी 1, सुर्ली 1, सासुर्वे 1, कुमठे 1, कोरेगाव 3, सातारा रोड 1, रुई 1, त्रिपूटी 1, दहिगाव 1, धुमाळवाडी 1, किन्हई 2, देऊर 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, शिरवळ 4, कर्णवाडी 1, भादे 1, गुठळे 1, धावडवाडी 1, समता आश्रमशाळा 12, खंडाळा 3, हरळी 1, आरतगाव 1, केसुर्ली फाटा 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील मुनवर हौसिंग सोसायटी 1, हॉटेल सनी 2, पाचगणी 3, महाबळेश्वर 1, 

जावली तालुक्यातील कुडाळ 3, रामवाडी 1, करंदी 2, आरडे 1

वाई तालुक्यातील बोरगाव 2, बावधन नाका 1, अमृतवाडी 1,

इतर -8

इतर जिल्हा इचलकरंजी 1, बोईसर, पालघर 1, 

एका बाधिताचा मृत्यु

          क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे दहिवडी ता. माण येथील 83 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने - 345788

एकूण बाधित - 58686 

घरी सोडण्यात आलेले -55600

मृत्यू- 1852 

उपचारार्थ रुग्ण- 1234