मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : माथाडी कामगार नेते राजाराम मुटल यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटनेच्या मागणीची थेट राज्याच्या वित्त विभागाने दखल घेत त्यांच्या मागणीसंदर्भात कार्यवाही करण्याचे उद्योग व कामगार विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
या माथाडी कामगार संघटनेने आपल्या कामगारांच्या मागणीसाठी सरकारी कामगार अधिकारी व सचिव मालवाहतूक कामगार मंडळ मुंबईचे हरीष पुरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता .मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संघटनेचे सरचिटणीस राजाराम मुटल यांनी थेट वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरू केला.
त्यानंतर वित्त विभागाचे कक्ष अधिकारी संख्ये यांनी उद्योग व कामगार विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना संबधित हरीष पुरी या सरकारी अधिकाऱ्याचे निवृत्तीवेतन थांबवून योग्य ती चौकशी करून संघटनेच्या मागणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.