"कुंभारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची दुरंगी लढत "

बिनविरोधाला वाटाण्याच्या अक्षदा...



कुंभारगाव | प्रतिनिधी : पाटण तालुक्यातून 107 ग्रामपंचायतीच्या 809जागांसाठी 1 हजार 656, अर्ज दाखल असून, कुंभारगाव ग्रामपंचायत निवडणूक 11 जागांसाठी सामोरे जात आहे, निवडणुकी साठी एकूण 24 अर्ज दाखल असून उमेदवाराची दमछाक झाली आहे. एकूण वार्ड 4असून लक्ष्मी वार्ड,क्र (2) मध्ये एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल करून जोरदार झटका दिल्याचे चित्र दिसत असून वार्ड क्र १ मध्येही अपक्ष उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की.                     

वार्ड नं, १ नाईकबा वार्ड मध्ये ग्रामविकास पॅनल कडून - महेश मोरे, संगीता शेट्ये   

कुंभारगाव विकास आघाडीकडून - धनाजी बोर्गे, शीतल बुरसे. तर अपक्ष -विलास बोर्गे.             

वार्ड क्र (2)लक्ष्मी वार्ड मध्ये ग्रामविकास पॅनल कडून रेखा सचिन कळंत्रे , महादेव वरेकर, नामदेव खटावकर.      

कुंभारगाव विकास आघाडी कडून शालन यादव, महेश सागावकर, उदयसिंह चव्हाण. अपक्ष -पोपट भंडारे,               

वार्ड क्र, (3)श्रीराम वार्ड वार्ड मध्यें ग्रामविकास पँनेल कडून संजय मोरे, जयश्री शिबे, प्रमिला घाडगे.

           कुंभारगाव विकास आघाडी कडून विमल शिबे, शोभा जाधव, राजेंद्र चव्हाण.                   

वार्ड क्र, 4,"मरीआई " वार्ड मध्ये ग्रामविकास पॅनेल कडून अनिता चव्हाण, प्रियांका पुजारी, दिलीप झीम्बरे.                

कुंभारगाव विकास आघाडी कडून सारिका पाटणकर, हणमंत कांबळे, वैशाली गुरव.

असे एकूण 24,उमेदवार रींगणात उभे असून, 2 उमेदवारांनी अपक्ष अर्ज ठेवून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहेत. ऐन थंडीत वातावरण गरम झाले असून, मतदाराच्या गाठी भेटीला जोर आला आहे . पारावर, कोपऱ्या कोपऱ्यात चर्च्या रंगू लागली आहे .कोरोना काळात 8 महिने जनता घरात बसून होती त्यावेळी हे कार्यकर्ते कोठे होते ?असे खाजगीत बोलले जात असून पारावरच्या गप्पात रंग भरू लागला आहे. निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तशीच हि निवडणूक अजून रंगतदार होणार व ढवळून निघणार हे मात्र नक्की. 

ग्रामविकास पॅनेलकडून डॉ दिलीपराव चव्हाण, माजी जि.प.सभापती संजय देसाई, शिवसेना उप शाखा प्रमुख माणिक देसाई, अशोक खेडकर , संभाजी चव्हाण, भीमराव चव्हाण, शंकरराव चव्हाण.तर कुंभारगाव विकास आघाडी कडून, योगेश पाटणकर, राजेंद्र चव्हाण नेतृत्व करत आहेत.

या चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.