ढेबेवाडी विभागातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार.

 ढेबेवाडी पोलिसांचा चोख बंदोबस्त.


कुंभारगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी लागलेली मतदारांची रांग.

( छाया : अनिल देसाई )

ढेबेवाडी / प्रतिनिधी :

ढेबेवाडी विभागातील अनेक राजकीय मातब्बरांच्या गावांमध्ये आज गाव कारभाऱ्यांसाठी मतदान झाले सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. विभागात 27 ग्रामपंचायतीमध्ये धुमशान सुरू होते यातील सात ग्रामपंचायती पूर्ण तर काही अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती साठी आज मतदान प्रक्रिया पार पडली यातील कुंभारगाव, गुढे, काळगाव, जानुगडेवाडी, कुठरे मोरेवाडी, धामणी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावात चुरशीची लढत झाली. या गावांमध्ये ढेबेवाडी पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. 

पाटणचे पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागात पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. विभागात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र सुरळीत व शांततेत मतदान पार पडले.

कुंभारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत चूरशीची लढत. 
74 टक्के मतदान झाले.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ढेबेवाडी विभागातील प्रमुख ग्रामपंचायती पैकी कुंभारगाव ग्रामपंचायत होय. या ग्रामपंचायतीसाठी 11 जागांसाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.व आपले नशीब आजमावत होते.

गाव कारभाऱ्यांसाठी ही निवडणूक काटे की टक्कर होती. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत सिल बंद झाले ‌.

गाव कारभाऱ्यांसाठी झालेल्या या चुरशीच्या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले. सर्वच वार्ड मध्ये मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.