कुठरे ; पवारवाडी ग्रामपंचायतीत श्रीराम पॅनेलचा दणदणीत विजय


कुठरे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ग्रामपंचायत पवारवाडी (कुठरे) ता.पाटण निवडणूकीत श्री राम पॅनल पवारवाडी यांनी 7-0 नी विजयी आघाडी घेत एकहाती सत्ता मिळवली आहे.

एकूण 7 जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 5 जागा बिनविरोध निवडणूक आल्या होत्या तर 2 जगासाठी निवडणूक झाली यामध्ये श्रीराम पॅनेलचे 2 उमेदवार आणि 2 अपक्ष उमेदवार अशी थेट अटीतटीची  लढत झाली यामध्ये श्रीराम पॅनेल चे दोन्ही उमेदवार विजयी झाले.यामध्ये हनुमान वॉर्ड मधून सौ.भाग्यश्री विजय लोहार 195 मतांनी निवडून आल्या तर विरोधी उमेदवारला फक्त 51 मते मिळाली आणि श्रीराम वॉर्ड मधून श्री.महेश संपतराव लोहार 119 मतांनी निवडून आले आणि विरोधी उमेदवाराला फक्त 61 मते मिळाली यामुळे दोन्ही पराभूत उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार
श्री.अंकुश पाटील,सौ.रुपाली पवार,सौ.माधवी जगदीश कदम,श्री.दत्तप्रसाद कदम,सौ.कोमल कदम.

सर्व विजयी सदस्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

सर्व विजयी उमेदवारांचे पवारवाडी व मुंबई ग्रामस्थ यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  श्रीराम पॅनेलचे नेतृत्व करणारे मा.अविनाश पवार ,राजू पवार सर,रमेश पवार सर,अधिक लोहार ,शिवाजी कदम तानाजी लोहार ,हेमंत कदम ,शामराव कदम(साहेब) संभाजी कदम सर ,रामचंद्र कदम(नाना),हरीश पवार , लालासाहेब चव्हाण सर ,विकास पवार ,वसंत मुंढेकर,मंगेश कदम,सचिन कदम,आनंदा कदम गुरुजी ,लक्ष्मण लोहार,अशोक पवार, शंकर पवार (दादा) विलास पवार ,दिलीप पवार सर्व ग्रामस्थ पवारवाडी, मुंबई तसेच युवा कार्यकर्ते मोरया ग्रुप,सार्व.गणेश मंडळ,ललकार गणेश मंडळ नेहरू युवा मंडळ, शिव स्वराज्य प्रतिष्ठान सर्व बचत गट, महिला मंडळ ,वरिष्ठ नागरिक या सर्वांनी मोलाचे योगदान देऊन पॅनल मधील सर्व सदस्यांना मार्गदर्शन करून निवडून आणले सर्वांचे श्री अविनाश पवार (दादा) यांनी आभार मानले.