बचतीचे दालन म्हणजे शिवसमर्थ संस्था - बाबासोा थोरात

 


तळमावले/वार्ताहर

अल्पावधीत लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था म्हणजे शिवसमर्थ होय. बचतीचे उत्तम दालन म्हणून संस्थेकडे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन बाबा महाराज मठाचे मठाधिपती बाबासोा विष्णू थोरात यांनी काढले. ते सवादे शाखा येथे आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण पुजेच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, देवबा वायचळ सर, विठ्ठलराव पाचुपते, पी.आर.सावंत, नानासाहेब सावंत, लक्ष्मण माने (सर), माधुरी माने डाॅ.प्रशांत कांबळे, सौ.लक्ष्मी सुतार, दिनकर कांबळे, रघुनाथ पाटील, मानसिंग जाधव-पाटील, जगन्नाथ थोरात, पुजाराणी थोरात, वसंत थोरात, राजाराम थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.

365 दिवस अविरत कार्यरत असलेल्या शिवसमर्थ संस्थेने आपल्या कार्यविस्ताराने जनमानसावर आपली प्रतिमा तयार केली आहे. एनईएफटी, आरटीजीएस अशा सुविधा देत संस्थेने काळानुरुप आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या संस्था आपली नेत्रदीपक वाटचाल  करत आहे.

आर्थिक सेवा देत असताना सामान्य माणसाला बचतीची सवय लागावी, त्या बचतीतून त्यांची छोटी मोठी कामे व्हावीत असा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी सांगीतले. प्रत्येक व्यक्तिला बचतीचे महत्त्व पटावे यासाठी संस्था विविध पातळयांवर प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, 2021 अखेर सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर 1 टक्के ज्यादा व्याजदर देणार असून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी सवादे परिसरातील अनेक मान्यवरांनी संस्थेस सदिच्छा भेटी देवून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, विजय सवादकर, विजय मोहिते, दादासोा नायकवडी, अभिजित गायकवाड, महादेव शेवाळे, शिवराज पाटील, शिवानी म्हारुगडे, रविंद्र चोरगे, धनाजी पाटील, सागर जाधव व शिवसमर्थ परिवारातील सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.