उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड चांदोली रोड वरील 50 वर्षे जुना ओंड गावानजीक असणारा दक्षिण मांड नदी वरील पूल जीर्ण झाल्यामुळे व नवीन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पाडण्यात आला .व सर्व वाहतूक उंडाळे तुळसण मार्गा मार्फत वळविण्यात आली आहे परंतु सदर मार्गावर बांधकाम विभागाने कोणतेही नियोजन केलेले नाही
अनेक ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळे वाहने उलट दिशेने जात आहेत व परत फिरून मागे येत आहेत.
तसेच या मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दिवसातून अनेक वेळा ट्राफिक जाम होत आहे .
या मार्गावर रयत कारखान्याकडे व कृष्णा कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक ,जनावरे ,शेतात जाणारी माणसं तसेच एसटीवाहतूक, ही सर्व या मार्गावरून जात असते.कोकण मार्गे कोळसा वाहतूक करणारे मोठे ट्रक ,डंपर या रस्त्यावरून पास होताना खूप मोठी अडचण निर्माण होते. व वाहतूक ठप्प होते या अडचणीचा विचार करून बांधकाम विभागाने तातडीने हा पर्यायी मार्ग दुरुस्त करावा व त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत अशी जोरदार मागणी वाहनचालक व गावानजीक असणाऱ्या नागरिकांनी केली आहे.