मुंबईतील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड भुजवालाला रायगडमधून अटक


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला एनसीबीने अटक केली आहे. भुजवाला हा दाऊद गँग आणि दुबईतील ड्रग्ज नेटवर्कच्या थेट संपर्कात होता. एनसीबीने केलेल्या छापेमारीनंतर भुजवाला फरार होता. अखेर त्याला रायगडमधून अटक करण्यात आली. 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत नुकतीच एनसीबीने भुजावालाच्या घरावर धाड टाकली होती. भुजवाला मुंबईतील डोंगरी भागात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. छापेमारीसाठी एनसीबी भुजवालाच्या घरी पोहोचली, तेव्हा तो खिडकीतून उडी मारुन पसार झाला. एनसीबीच्या हातावर तुरी देऊन भुजवाला पसार झाला, मात्र ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा १२ प्रकारचा कच्चा माल, कोट्यवधी रुपयांची रोकड आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती. भुजवालाने आपले जाळे फक्त मुंबईतच नव्हे, तर परदेशापर्यंत पसरवले होते, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने म्हटले आहे.

अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणला एनसीबीने गजाआड केले आहे. पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली. त्यानंतर दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजावालाला पकडण्याचे जाळे एनसीबीने पसरले करण सजनानी ड्रग कनेक्शनमध्ये समीर खान यांचे नाव समोर आले होते .

त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलवले आणि यात त्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक केली आहे. याच प्रकरणात वांद्रेमधून एका व्यक्तीला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले असून त्याचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती वानखेडेंनी काही दिवसांपूर्वी दिली होती.समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते मोठे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याआधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे,” असेही समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.