साहेब या मोदीनं शेतकऱ्यांचं पाक कंबरड मोडलंय बघा...

कोपर्डे बाजारात एका शेतकऱ्याने पृथ्वीराज बाबांच्या समोर मांडली शेतकऱ्यांची व्यथा.कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज बाबा आज कोपर्डे येथे एका सांत्वन भेटीसाठी आले असता त्या भेटीनंतर बाहेर पडताना कोपर्डे बाजारला भेट दिली. यावेळी पृथ्वीराज बाबांनी भाजीपाला विकण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्याकडून भाज्या सुद्धा विकत घेतल्या.
पृथ्वीराज बाबांच्या अश्या अचानक येण्याने बाजारात पृथ्वीराज बाबांच्या भोवती एकच गराडा पडला. तिथे उपस्थित एक शेतकरी पृथ्वीराज बाबांना म्हणाले कि साहेब या मोदीनं शेतकऱ्यांचं पाक कंबरड मोडलंय बघा.... बाबा त्या शेतकऱ्याला उत्तर देताना म्हणाले कि यासाठी आपणच आता शहाणं झालं पाहिजे...असे म्हणताच उपस्थित शेतकऱ्यांनीही बाबांना दाद दिली.यावेळी बाबांनी सर्वांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्यासोबतच नाही तर तेथील बाळगोपालांच्या सोबत सुद्धा फोटोसेशन केले. यावेळी बाबांच्यासोबत अजितराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते इंद्रजीत चव्हाण, आदी उपस्थित होते.
Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज