माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख पदी सागर पाटील यांची निवड







सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख पदी मंद्रुळकोळे (पाटील आवाड) ता.पाटण येथील सागर दिलीप पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर, यांच्या संमतीने,महाराष्ट्र राज्य उपाध्यश अमर बेंद्रे, महाराष्ट्र राज्य सचिव सुभाष भोसले,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख इद्रीस सिद्दीकी यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. संबंधित नियुक्तीस राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, व सागर पाटील मित्रपरिवार, व्यापारीवर्गातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.